म. गां. रा. ग्रा. रो. ह. यो. कुटुंबाच्या Job Card (जॉब कार्ड) नोंदणीसाठी अर्ज व पोहच पावती व इतर प्रपत्र 1, 2
हा अर्ज कुटुंबाचे नवीन जॉब कार्ड नोंदणी करण्यासाठी उपयोगी आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सामान्य नागरिकांना रोजगाराची हमी दिली जाते. त्यानुसार मजूर वर्ग गटविकास अधिकारी यांना कामाची व रोजगाराची मागणी करू शकतात त्यानुसार गावात सुरू असलेल्या सर्व सरकार अनुदानित कामाच्या ठिकाणी मजुरास काम व रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
* या अर्जामध्ये खालील माहिती भरावी लागते :-
1) कुटुंब प्रमुखाचे नाव.
2) अर्जदाराचे नाव.
3) अर्जदारचा पत्ता (घर क्रमांका सह), मोबाईल क्र. (असल्यास)
4) जात प्रवर्ग अ.जा.,
अ.ज., इतर मागासवर्गीय व इतर.
5) अल्पसंख्यांक :- होय / नाही.
6) अल्पभूधारक शेतकरी, सीमांत शेतकरी अहे का ?
7) भुसुधार लाभार्थी :- होय / नाही.
8) इंदिरा आवास योजना लाभार्थी :- होय / नाही.
9) आम आदमी बीमा योजना लाभार्थी :- होय / नाही.
10) राष्ट्रीय
स्वास्थ बीमा योजना लाभार्थी :- होय / नाही. असल्यास क्रमांक.
11) दारिद्र्य
रेषेखालील उटुंब :- होय / नाही. असल्यास क्रमांक.
12) अनुसूचीत जमाती व इतर पारंपरिक वन हक्क मान्यता अधिनियम 2006 अंतर्गत जमीन मिळाली आहे का :- होय / नाही.
13) अर्जदार कुटुंबातील मजूर सर्व प्रौढ व्यक्तींचे नाव, कुटुंब प्रमुखाशी नाते, लिंग, वय, अपंग आहे किंवा नाही, आधार क्रमांक, निवडणूक ओळखपत्र क्र., बँक / पोस्ट खाते क्र.
14) या अर्जावर कुटुंबातील
अर्जदार प्रौढ व्यक्तींचा पोस्टकार्ड आकाराचा ( 4 X 6” size ) रंगीत, एकत्रित फोटो लावणे आवश्यक आहे.
15) उर्वरित माहिती कार्यालयीन उपयोसाठी असते ती ग्रामसेवक किंवा संबंधित
कर्मचारी यांच्याकडून भरली जाते व पोहच पावती दिली जाते. यामध्ये अर्ज मिळाल्याची
तारीख, अर्ज अनू. क्रमांक अर्ज मंजूर, नामंजूर करण्याचे कारण व अर्ज मंजूर केल्यास जॉब कार्ड
पुस्तीका दिल्याची तारीख नमूद केली जाते.
* इतर महत्वाच्या सूचना
:-
1) मजूर कुटुंबाने नोंदणीसाठी हा अर्ज
ग्रामसेवकाकडे द्यावा.
2) ग्रामसेवक अनुपस्थित असल्यास किंवा
ग्रामसेवकाकडे, ग्राम पंचायतमध्ये अर्ज देणे
शक्य नसल्यास अर्ज गट विकास अधिकार्याकडे द्यावा.
3) छापील अर्ज उपलब्ध नसल्यास कोर्या कागदावर
नमुना – १ मधील माहिती लिहून दिली तरी
चालेल.
4) स्थानिक रहिवासी असल्यास, वय वर्ष १८ पूर्ण केलेल्या आणि अकुशल काम करू इच्छिणार्या
कुटुंबातील व्यक्ती नोंदणीसाठी पात्र आहेत.
5) कुटुंब नोंदणी ही वर्षभर सतत चालणारी प्रक्रिया आहे.
* प्रपत्र 1 :- या
प्रपत्रात अर्जदार स्वताहाचा आधार क्रमांक आपल्या बँक खात्याशी जोडण्याची सहमती देतो.
यामुळे शासनाचे अनुदान माजुरच्या खात्यात थेट व अचूक जमा करण्यास सुविधा होते व पैशाच्या अपहारास आळा बसतो.
* प्रपत्र 2 सहमती पत्र :- याद्वारे अर्जदार कार्यान्वयीन यंत्रणा, महाराष्ट्र शासन, ग्राम विकास
विभाग, भारत सरकार यांना आधार क्रमांक महात्मा गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत सक्रियता व ओळख सिध्द करण्याच्या
प्रक्रियेसाठी वापरण्याची सहमती देतो.
वरील अर्ज , प्रपत्र 1 व ची PDF फाईल सोबत देत आहे.
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know