Ferfar Arj, Adhikar Sampadan अर्ज नमूना / फेरफार अर्ज, अधिकार संपादन करावयाच्या अर्जाचा नमुना व सत्यप्रतिज्ञालेख PDF

फेरफार अर्ज हा जमीन संपादन / नावे करून घेण्यासाठी करावयाचा अर्ज असतो कुठल्याही प्रकारचे मिळकत संपादन असो हा अर्ज जोडणे अनिवार्य आहे. या अर्जामध्ये अर्जदार अधिकार जमीन, मिळकत संपादनाचे विवरण देऊन सत्यप्रतिज्ञालेख सही करून देतो. या अर्जसोबत जोडावे लागणारे कागदपत्र खालील प्रमाणे आहेत.

* जमिन ज्या अधिकारान्वये धारण केलेली आहे. त्या अधिकारान्वये जमिन नांवे होण्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या कागदपत्रांची सुचि:-

अ.क्र.

संपादनाचा प्रकार

आवश्यक कागदपत्राच्या जोडलेले पुराव्याच्या सांक्षाकित प्रती

वारस हक्काने / उत्तराधिकाराने अनजीविताधिकाराने

मृत्यूदाखला, सत्यप्रतिज्ञालेख, पोलीस पाटील / ग्रामसेवक / सरपंच यांचा दाखला, सर्व वारसांचे नावे, वय, पत्ते व दुरध्वनी क्रमांक / भ्रमण दुरध्वनी क्रमांक (असल्यास) , रहिवास बाबतचा पुरावा.

खरेदीने

नोंदणीकृत खरेदी खताची प्रत, सूची क्र.२ ची प्रत, खरेदीदार शेतकरी असल्याचा तहसिलदार यांचा दाखला अथवा अन्य पुराव, सत्यप्रतिज्ञालेख रहिवास बाबात पुरावा

बक्षीसपत्राने

नोंदणीकृत बक्षीसपत्राची प्रत, सूची क्र. २ ची प्रत, शेतकरी असल्याचा तहसिलदार यांचा दाखला अथवा अन्य पुरावा, सत्यप्रतिज्ञालेख, रहिवास बाबत पुरावा.

हक्कसोडपत्राने

नोंदणीकृत हक्कसोड पत्राची प्रत, सूची क्र. २ ची प्रत, सत्यप्रतिज्ञालेख, रहिवास बाबत पुरावा

मृत्यूपत्राने

नोंदणीकृत मूत्यूपत्राची प्रत, सूची क्र.२ ची प्रत, मुत्यूपत्र नोंदणीकृत नसल्यास दिवाणी न्यायालयाकडील प्रोबेटची प्रत, शेतकरी असल्याचा तहसिलदार यांचा दाखला अथवा अन्य पुरावा, सत्यप्रतिज्ञालेख, रहिवास बाबत पुरावा.

विभागणीने किंवा वाटणीपत्राने

नोंदणीकृत वाटणीपत्राची प्रत, कलम ८५ नुसार सक्षम अधिकाऱ्याने दिलेले आदेश, तालुका निरिक्षक भूमी अभिलेख यांचेकडील पोटहिस्सा मोजणी झालेबाबत अहवाल.

गहाणखताने

नोंदणीकृत गहाण खताची प्रत, सूची क्र.२ ची प्रत, सत्यप्रतिज्ञालेख, रहिवास बाबात पुरावा.

भाडेपट्टयाने

नोंदणीकृत भाडेपट्याची प्रत, सूची क्र.२ ची प्रत, सत्यप्रतिज्ञालेख, रहिवास बाबत पुरावा.

विकास कराराने

नोंदणीकृत विकास कराराची प्रत, सूची क्र.२ ची प्रत, सत्यप्रतिज्ञालेख, रहिवास बाबत पुरावा

१०

न्यायालयाचे अथवा अर्ध न्यायीक कोर्टाचे आदेशाने

न्यायालयाचे / अर्ध न्यायीक कोर्टाचे आदेशाची सांक्षाकित प्रत, आवश्यक्ता असल्यास तालुका हुकूम, सत्यप्रतिज्ञालेख, रहिवास बाबात पुरावा.

११

शासकीय आदेशाने

शासकीय आदेशाची प्रत, शा. नि. दि. ३१/१०/०६ नुसार नोंदणीकृत करारनामा, तालुका हुकूम, सत्यप्रतिज्ञालेख, रहिवास बाबात पुरावा.

१२

सहकारी सोसायटी / बँकेच्या आदेशाने

सहकारी सोसायटीचे / बँकेचे पत्राची प्रत

१३

अन्य कारणाने

परिस्थितीनुरूप कागदपत्रे, सत्यप्रतिज्ञालेख रहिवास बाबत पुरावा.

रहिवास बाबतचा पुरावा:- १) पारपत्र (पासपोर्ट) २) वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हींग लायसन्स) / ३) आयकर विभागकडील कायम खाते क्रमांक असलेबाबात ओळखपत्र (पॅनकार्ड) ४) केंद्र / राज्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ पब्लीक लिमिटेड कंपनीने दिलेले ओळखपत्र (आयडेंटीटी कार्ड) ५) राष्ट्रीय कृत बँकेकडील पासबुक / पोस्टाकडील पासबुक ६) मान्याताप्राप्त शाळेने दिलेले ओळखपत्र (आयडेंटी कार्ड) ७) मिळकतीचे दस्ताऐवज उदा. नोंदणीकृत लेखे ८) सेवा निवृत्ती बाबत माजी सैनिकांना दिलेले ओळखपत्र (आयडेंटी कार्ड) ९) स्वातंत्र्य सैनिकांना दिलेले ओळखपत्र (आयडेंटी कार्ड ) १०) शस्त्र परवाना, (थार्मस लायसन्स) ११) सक्षम अधिकाऱ्याने अपंग व्यक्तीस दिलेले प्रमाणपत्र (हंडीकॅप सर्टिफिकेट) १२) ग्रामपंचायत /नगरपालिका/ महानगरपालिका कडील मिळकतीचे विवरण दर्शविणारे पत्रक (असिसमेंट उतारा) १३) दुरध्वनी देयक (टेलीफोन बील) १४) विजाचे देयक (ईलेक्ट्रीसिटी बील) वरील पैकी किमान एक.

हा अर्ज व सर्व कागद पत्राचा संच तलाठी यांच्याकडे दिल्या नंतर ते 15 दिवसाची नोटिस काढून मंडल अधिकारी यांच्या सहाय्याने फेरफार नोंद घेतात अशा या महत्वाच्या अर्जाची PDF फाईल लिंक खाली देत आहे. तसेच महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.

* अर्जाची PDF फाईल लिंक:- फेरफार अर्ज

                                                                     
Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !