सौर कृषिपंप हस्तांतरित करून मिळणे बाबत हमीपत्र / Hamipatra Saur Krushi Pamp PDF

      मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत आपण अर्ज केलेला असेल तर अनुदान प्राप्त करण्यासाठी आपल्याला अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., संवसु मंडळ कार्यालय यांना हमीपत्र लिहून द्यावे लागते. त्यात डी.सी. प्रकारचा सौर कृषिपंप हस्तांतरित करून देणेबाबत विषयावर हमीपत्र दिले जाते.

      या हमीपत्रात लाभार्थी आपले नाव, वय, पत्ता, स्वमालकीच्या शेत जमिनीचे ठिकाण, सर्वे नं./गट न., एकुण लाभाचे क्षेत्र, मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत ज्या अश्वशक्ती क्षमतेचा डी.सी.प्रकारचा सौर कृषिपंप महावितरण कंपनी हस्तांतरीत करून दिल्याचा दिनांक नमूद करतो.

* यासाठी काही अटी व शतींची पूर्तता विनाअट करण्यास हमी द्यावी लागते त्या खालील प्रमाणे आहेत:-

  1. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत अर्जातील मागणीनुसार / प्रतिज्ञापत्रानुसार संपूर्ण जोडपत्र 1 भाग-A, भाग-B आणि भाग-c मध्ये दिलेली संपूर्ण माहिती सोबत जोडली आहे शेत जमिनीची, विहीरीची / पडताळणी महावितरण तर्फे करण्यात आली व त्यानुसार माझी लाभार्थी म्हणून निवड (लाभार्थी क्रमांक:- ..................) झाल्यानंतर सौर कृषिपंपाचे तांत्रिक निकष / डिझाईन ठरवून ....... अश्वशक्ती डी.सी. पंप मंजूर करून आस्थापित करून देण्यात आला आहे.
  2. सदर सौर कृषिपंप बसविण्याकरीता माझ्या शेत जमिनीत प्रवेश करण्याच्या परवानगीस माझी सहमती आहे व तशी हमी मी देत आहे.
  3. सौर कृषिपंप तपासणीसाठी वेळोवेळी आलेल्या अधिका-यांना, दुरूस्ती कर्मचा-यांना योग्य ते सहकार्य मी करावयाचे आहे. त्यास मी हरकत / अडथळा करणार नाही.
  4. सौर कृषिपंपाच्या देखरेख व सुरक्षेची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे.
  5. सदर सौर कृषिपंप यांची दैनंदिन देखभाल / घ्यावयाची काळजी याबाबतची मुलभूत माहिती मला देण्यात आली आहे. यानुसार सदर सौर कृषिपंपाची देखरेख, संचालनाची, व्यवस्थित हाताळण्याची माहिती/वापर करण्याची संपूर्ण जबाबदारीमाझी असून त्याची मला जाणीव आहे व ते पालन करण्याची मी हमी देत आहे.
  6. सदर सौर कृषिपंपाचा सर्वसमावेशक देखभाल व दुरुस्तीचा कालावधी 5 वर्षांचा असून या कालावधीत सदर सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती व देखभाल निश्चित केलेल्या कालावधीत विनामुल्य करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असल्यामुळे सौर कृषिपंप ना दुरुस्त झाल्यास संपकांसाठी दिलेल्या क्रमांकावर ........................... तात्काळ कळविण्याची जबाबदारी माझी आहे.
  7. सदर 5 वर्षाच्या कालावधीत जर माझ्याकडून सदर सौर कृषिपंपाला काहीही नकसान झाल्यास त्याची सर्व जबाबदारी माझी राहील, याची मला जाणीव आहे.
  8. सदर सौर पंपाच्या साधनांची चोरी झाल्यास त्याची सूचना मी महावितरण कंपनीस द्यावयाची असून त्यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात फिर्याद द्यावयाची आहे, याची मला जाणीव आहे.
  9. ज्या शेतजमिनीत (सर्वे नं. .................. ) सदर सौर कृषिपंप बसविण्यात आला आहे, ती शेत जमीन सदर कराराच्या 5 वर्षांच्या कालावधीत विकायची असल्यास तशी लिखीत परवानगी महावितरणकडून (ना हरकत प्रमाणपत्र) घेणे मला बंधनकारक आहे व तशी मी आज रोजी हमी देत आहे.
  10. मला सदर सौर कृषिपंप कोणत्याही परिस्थितीमध्ये हस्तांतरीत, विक्री करण्याची, तांत्रिक बदल, तसेच दुरूस्ती करण्याची परवानगी नाही, याची मला जाणीव आहे.
  11. सदर सौर कृषिपंप कार्यान्वित करून मिळाल्याने पुढील 10 वर्षे मला पारंपारिक पध्दतीने कृषिपंपासाठी विद्युत पुरवठा महावितरण कंपनी कडून मिळणार नाही, याची मला जाणीव आहे.
  12. वरील सर्व अटी व शर्ती माझ्यावर तसेच माझ्या वाली-वारसदारांवर देखील बंधनकारक आहे.
    सदर हमीपत्रावर लाभार्थी पासपोर्ट साईज फोटो लाऊन सही करतो एका पंचाची सही घेतली जाते तसेच महावितरण प्राधिकृत अडीकरी यांचा सही व शिक्का घेतला जातो. या नंतर लाभार्थी माहिती देऊन महावितरण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाणे काढलेले जिओ टॅग 4X6 आकाराचे फोटो हमीपत्रावर चिटकावले जातात. अशा महत्वाच्या हमीपत्राची PDF फाईल लिंक खाली देत आहे. तसेच महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.


                                                                     
Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !