Namuna No. 8 New Format / नवीन नमुना नं. 8 ग्रामपंचायत PDF

     महाराष्ट्र शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार नमूना नं. 8 मध्ये बदल केला गेला असून त्यानुसार नमूना नं. 8 हा मालकी हक्काचा पुरावा समजण्यात येऊ नये असे सुचवले गेले आहे. नवीन परिपत्रक खलील प्रमाणे आहे.

१) महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन परिपत्रक क्रमांक : पंरास २०१६/प्र.क्र.१७/पंरा-४दि.१८ जुलै, २०१६, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२४ व त्याअंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (शुल्क) नियम १९६० यांमधील तरतुदींनुसार गावाच्या सीमेतील इमारती (मग त्या कृषी आकारणीस अधीन असोत किंवा नसोत) व जमिनी (ज्या कृषी आकारणीस अधीन नाहीत) यावर ग्रामपंचायतीस कर बसविण्याचा अधिकार आहे. करपात्र मिळकतींच्या नोंदी ग्रामपंचायती कडील नमुना नं.८ म्हणजेच, (कर आकारणी नोंदवही मध्ये करण्या बाबत तरतूद आहे) नमुना नं.८ म्हणजेच कर आकारणी नोंदवही मध्ये इमारतीची व जमिनीची नोंद घेतल्यामुळे अनधिकृत / अतिक्रमित / अवैध इमारती / बांधकाम / जमिनीच्या हद्दी व मोजमापे हे अधिकृत होत नाही, याची नोंद घ्यावी. टिप : सदरील नमुना नं.८ ची नक्कल केवळ कर आकारणी साठी असुन मालकी हक्क पुरावा म्हणुन ग्राह्य धरण्यात येवू नये.

२) म.शा./क.व्हीपीएम २०१६/प्र.क्र.६०/पं.स/ग्रामविकास विभाग,मुंबई दि.०४/१२/२०१७ नुसार, ग्रामपंचायतीचा नमुना नं.८ मधील मिळकतीवर कर्जाचा बोजा अगर इतर कोणताही बोजा नोंदविण्याबाबतची तरतुद नाही. ग्रामपंचायतचा नमुना नं.८ हा अधिकार अभिलेख नसुन, फक्त कर आकारणी नोंदवही असल्यामुळे त्यावर सहकारी संस्थाचे भार / कर्ज बोजा नोंदविता येणार नाहीत. सदर नमुना नं.८ मधील - चतुर्सिमा/मोजमापे तांत्रिक पध्दतीने प्रमाणीत नसुन केवळ कर आकारणीसाठी नोंदी मालमत्ता भोगवट धारकाने दिलेल्या माहितीच्या आधारे नोंदी केल्या आहेत, त्यामुळे जागेची खरेदी, विक्री / कर्जबोजा व कोर्ट कामी ग्राह्य धरल्यास व काही वाद - विवाद झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार असणार नाही.

Namuna No. 8 / नमुना नं. 8 ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत गावठाण हद्दीतील असलेल्या घरांची व जमिनीची माहिती असते. करास पात्र असलेल्या जमिनी व इमारती (घर) यांची नोंद यात असते. तसेच त्या जागेचे मालक, भोगवटदार, भरणा केलेला कर, एकूण क्षेत्रफळ तसेच जागेची चतु:सीमा दिलेली असते. 

     ही झाली माहिती आता पाहू नमुना नं. 8 ची गरज कोठे लागते. घर जागा खरेदी विक्री करण्यासाठी, घर व जागेशी संभंधित विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी इत्याती अनेक कामासाठी नमुना नं. 8 ची गरज असते. त्यामुळे नमुना नं. 8 नवीन व जुने PDF लिंक सोबत देत आहे.

* PDF फाईल लिंक :- 

1) नवीन नमुना नं. 8

2) नमुना नं. 8 जुना 1

3) नमुना नं. 8 जुना 2

                                                           


Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती मिळवण्याकरिता किंवा समस्या असेल तर कमेंट करा, नियमित पोस्ट मिळण्यासाठी टेलिग्राम जॉईन करा.

धन्यवाद !