विहीर / बोअर लावण्याचा अर्ज (संचिका) PDF
    शेतकरी बांधवांना आपल्या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर नवीन किंवा जुन्या विहीर, बोअर ची नोंद घेतलेली नसल्यास या संचिकेचा उपयोग होतो. आपल्या शेत जमिनीमध्ये असलेल्या विहीर / बोअर ची नोंद 7/12 उताऱ्यावर घेण्याचे फायदे खलील प्रमाणे आहेत.

1) जमीन ओलिताखाली असल्याचे ग्राह्य धरून बँके मार्फत वाढीव कर्ज दिले जाते.
2) आपल्या शेतात पाण्याचा स्त्रोत दाखवल्या मूळे आपल्याला सौर ऊर्जा पंप, ठिबक, तुषार सारख्या सिंचन सुविधेचा लाभ घेता येतो. 
3) सरकारी योजना व अनुदान याचा अधिक लाभ मिळतो.

* या संचिकेत खलील प्रमाणे कागदपत्र आहेत :-
1) अर्ज :- यात अर्जदार 7/12 उताऱ्यावर विहीर / बोअर ची नोंद घेण्याची विनंती करतो.

2) जाहीर प्रगटन (विहीर दस्त) :- यात तलाठी विहीर / बोअर नोंदीमध्ये कुणाचा आक्षेप असेल तर दिलेल्या मुदतीत कळवण्याचे सुचवतात.

3) पंचनामा :- यात विहीर / बोअर चा पंचनामा करून तलाठी व पाच पंच त्यावर सह्या करतात.

4) फोटोचा तपशील :- या पानावर विहीर / बोअर चा नोट कॅॅम मध्ये काढलेला फोटो लावावा.

5) शपथपत्र :- यात 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर लाभार्थी सविस्तर विहीर / बोअर चे वर्णन करून त्यात असलेल्या हिस्सेदाराची अनेवारी स्पष्ट करून त्यावर सह्या केल्या जातात.

    वरील सर्व प्रमाणपत्राची PDF फाईल लिंक सोबत देत आहे. तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्राच्या अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.


                                                           

Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !