Ration Card / रेशन कार्ड / शिधापत्रिका बाबत विविध अर्ज
आज आपण माहिती घेणार आहोत शिधापत्रिके संबंधीत वेळोवेळी उपयोगी पडणाऱ्या विविध अर्जा बाबत. सामान्य नागरिकापर्यंत अन्न-धान्य पुरवठा करण्यासाठी कुटुंबास एक रेशन कार्ड दिले जाते. ज्या मध्ये कुटुंबातील सर्व लहान - मोठ्या सदस्यांची नोंद असते. रेशन कार्डचा रहिवास बाबत पुरावा म्हणून सुद्धा उपयोग होतो. शिधापत्रिके बाबत खालील काही अर्ज आपणास उपयोगी आहेत.
1) शिधापत्रिकेची व्दितीय प्रत मिळणे बाबत अर्ज :-
आपले रेशन कार्ड गहाळ झाले असेल तर तहसील मधील पुरवठा विभागात शिधापत्रिकेची व्दितीय प्रत मिळणे बाबत अर्ज करून नवीन प्रत मिळवू शकता.
2) शिधापत्रिकेतून नाव कमी करणे बाबत :-
विवाह पश्चात स्थलांतर, विभक्त कुटंब किंवा शिधापत्रिकेत नाव समाविष्ट असलेली व्यक्ती मयत झाली असेल तर त्यांचे नाव शिधापत्रिकेतून वगळण्यासाठी हा अर्ज आहे.
3) शिधापत्रिका स्वयंघोषणापत्र :-
नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करताना कुटुंबातील सदस्य आणि दिलेली माहिती सत्य असल्याबाबत स्वयंघोषणापत्र दिले जाते.
वरील अर्जाच्या PDF फाईल लिंक सोबत देत आहे. तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्राच्या अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know