CDM / Cash Deposit Machine / कॅश डिपॉजीट मशीन मध्ये पैसे आडकल्या बाबत अर्ज

    बँकेत होणारी गर्दी व खाते धारकांची गैरसोय टाळण्यासाठी विविध बँकांनी ATM सारख्या काम करणाऱ्या Cash Deposit Machine सुद्धा सुरु केल्या आहेत. त्यामध्ये खाते धारकास नगद रक्कम जमा करण्याची सुविधा मिळते. मात्र काही तांत्रिक अडचणी मुळे रक्कम जमा करताना आडकण्याची शक्यता असते. असा प्रकार आपल्या सोबत घडल्यास काय करावे याची माहिती आज आपण पाहू.

* Cash Deposit Machine मध्ये रक्कम जमा करण्याआधी घ्यावयाची काळजी :-

1) 49000 /- पेक्षा जास्त रक्कम भरू नये. 

2) 49000 /- भरताना शक्य असेल तर दोन टप्प्यात भरावे जेणेकरून पुर्ण रक्कम एकदम अडकणार नाही.

3) एकूण रक्कम व नोटांच्या तपशीलाची आधीच नोंद करून घ्यावी.

4) शक्य असेल तर 500 व 2000 च्या नोटा जमा कराव्या कारण नोटांची संख्या कमी होते व रक्कम अडकण्याचे प्रमाण कमी होते.

5) बँक सर्वर डाऊन असल्याचे लक्षात आल्यास रक्कम जमा करण्याचा प्रयत्न करू नये.

6) जमा कारावयांच्या नोटा सुस्थित असाव्यात जुन्या, फाटलेल्या किंवा चिटकवलेल्या नसाव्यात.

    वरील प्रणाने काळजी घेऊन देखील रक्कम अडकली तर संबंधित बँकेत अर्ज करावा अर्जाच्या नमुन्यांची PDF फाईल सोबत जोडत आहे. अर्जात दिलेली माहिती अचूक भरून बँकेत दिल्या नंतर बँक कर्मचारी पडताळणी करून 4 ते 7 दिवसामध्ये रक्कम आपल्या संबंधित खात्यात जमा करतो. 

* अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :-

1) ज्या बँकेत रक्कम जमा केली जात होती त्या खात्याचे बँक पासबुक झेरॉक्स प्रत.

2) संबंधित खातेधारकाचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत.

3) Cash Deposit Machine मधून पावती मिळाली असेल तर त्याची प्रत.

PDF फाईल लिंक:- 


                                                           

Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !