दस्ताची प्रमाणित प्रत मिळणे बाबत अर्ज
मालमत्ता खरेदी विक्रीचा व्यवहार ठरल्या नंतर दुय्यम निबंधक कार्यालयात (रजिस्ट्री कार्यालय) देणार, घेणार व साक्षीदार यांच्या समक्ष व्यवहार पुर्ण केला जातो. त्यानुसार पुर्ण दस्तऐवज तयार केले जातात. यालाच दस्त प्रत किंवा रजिस्ट्री प्रत (संच) म्हणतात. या दस्ताची गरज पुढील खरेदी - विक्री व्यवहार करण्यासाठी, मालकीची माहिती मिळवण्यासाठी, न्यायालयीन खटल्यात पुरावा म्हणून, बँकेमार्फत कर्ज मिळवण्यासाठी अशा बऱ्याच ठिकाणी असते.
आपल्याकडून दस्ताची मूळ प्रत गहाळ झाली असेल किंवा अन्य कुठलेही कारण असो आपण त्याची दुय्यम प्रत तहसील मधील दुय्यम निबंधक कार्यालयातून मिळवू शकतो. त्यासाठी एक अर्ज करावा लागतो त्याची PDF फाईल सोबत देत आहे. दस्ताची दुय्यम प्रत मिळवण्यासाठी काही शुल्क आकारले जाते त्याचा तपशील अर्जाची मागील बाजूस दिला गेला आहे. या आकारल्या जाणाऱ्या शुल्कामध्ये तफावत आढळून येऊ शकते याची नोंद घ्यावी.
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know