PM-KISAN अपात्र लाभार्थी पात्र करणे बाबत

    PM-KISAN योजने अंतर्गत केंद्र सरकार शेतकरी लाभार्थी यांना वार्षिक 6000/- रुपयाची मदत केली जाते. तसेच राज्य शासनाने सुद्धा वार्षिक 6000/- अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र KYC अभावी किंवा अन्य कोणत्याही करणामुळे या अनुदानाचे हप्ते जर स्थगित केले गेले असतील तर शेतकरी बांधव हे खाली दिलेला अर्ज व संबंधित लाभार्थ्याचे जमिनीचे व संबंधित कागदपत्र तालुका कृषि अधिकारी यांच्या नावे त्यांनी नेमून दिलेल्या अधिकाऱ्याकडे देऊन अनुदान सुरु करून घेऊ शकतात.

* सबंधित आवश्यक कागदपत्रांची यादी व सूचना :-

१. आधार कार्ड झेरॉक्स (पती व पत्नी दोघाचे झेरॉक्स आधार किंवा जर दोघापैकी कोणी एक मयत असतील तर त्याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे.)

२. आधार KYC केलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत.

३. ७/१२ व आठ-अ (होल्डींग.)

४. फेरफारची नक्कल (१ फेब्रुवारी २०१९ या दिनांकाच्या आधिची असेल तर कागदपत्रे जमा करावीत अन्यथा जमा करु नयेत.)

५. आधार सोबत लिंक (जोडलेला) असलेला मोबाईल व आधार नंबरवरच टाकावा.

    वरील अर्जाची PDF व Word फाईल लिंक सोबत देत आहे. तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्राच्या अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.

PDF फाईल लिंक:- 

                                                           

Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !