कच्चे घर असल्या बाबत प्रमाणपत्र, ग्रामसेवक / स्वयंघोषणापत्र / घरकुल लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र
घरकुल मिळणे बाबत प्रस्ताव सादर करताना विविध पात्रता प्रपत्रांचे संकलन करावे लागते त्यामध्ये खालील काही प्रपत्रांची मागणी केली जाते.
1) कच्चे घर असल्या बाबत प्रमाणपत्र :-
घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यास ग्रामसेवक यांच्याकडून कच्चे घर असल्या बाबत प्रमाणपत्र घ्यावे लागते.
2) कच्चे घर असल्या बाबत स्वयंघोषणापत्र :-
ग्रामसेवक यांच्याकडून कच्चे घर असल्या बाबत प्रमाणपत्र मिळत नसेल तर स्वयंघोषणापत्र सुद्धा देता येते.
3) लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र घरकुल :-
ईतर योजनेतून घरकुल लाभ मिळाला असेल तर लाभार्थी अपात्र ठरतो म्हणून हे प्रमाणपत्र स्वयंघोषणापत्र जोडावे लागते.
4) लाभ न घेतल्याचे ग्रामसेवक घरकुल :-
वरीलप्रमाणेच ईतर योजनेतून घरकुल लाभ मिळाला असेल तर लाभार्थी अपात्र ठरतो म्हणून ग्रामसेवक यांच्याकडून हे प्रमाणपत्र घेणे योग्य ठरते.
वरील अर्जाच्या PDF फाईल लिंक सोबत देत आहे. तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्राच्या अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know