BIRTH CERTIFICATE जन्म प्रमाणपत्र ग्रामपंचायत / नगरपरिषद अर्ज PDF
जन्म प्रमाणपत्र हे मुलांची आधार नोंदणी करणे, शाळेत प्रवेश घेणे या कारणास्तव आवश्यक प्रमाणपत्र आहे. RTE 25% सारख्या योजनेच लाभ घेण्यासाठी सुद्धा या प्रमाणपत्राची मागणी केली जाते. सध्या BIRTH CERTIFICATE हे ऑनलाईन मिळत आहे. मात्र तांत्रिक अडचणी व ऑनलाईन प्रक्रिये मध्ये होत असलेला विलंब लक्षात घेता खाली दिलेल्या नमुन्यात लेखी स्वरुपात जन्म प्रमाणपत्र ग्रामपंचायत मार्फत ग्रामसेवक यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता.
नगरपरिषद मार्फत मात्र तुम्ही लेखी स्वरुपात जन्म प्रमाणपत्र घेऊ शकत नाहीत. त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो. या अर्जाचा नमुना सोबत देत आहे. या अर्जा सोबत आई व वडीलांचे आधार कार्ड किंवा फोटो असलेल्या ओळखपत्राची प्रत आणि प्रसुती दवाखान्यात झाली असेल तर दवाखान्याचे प्रमाणपत्र जोडावे.
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know