Legacy (Varsa) Fer File Set / वारसा फेर फाईल संचीका मराठी PDF
आज आपण माहिती घेणार आहोत वारसा फेर फाईल संचिके बद्दल जेव्हा एखाद्या व्यक्तीचे आपल्या वरसांकरिता मृत्यू पत्र तयार न करता निधन होते तेव्हा या फाईल ची गरज असतेवारसा फेर घेऊन मयत व्यक्तीची जमीन सामाईक रित्या त्या व्यक्तीच्या सर्व कायदेशीर व्यक्तींच्या नावे केली जाते. वारसा फेर फाइल सांचीके मध्ये खलील कागदपत्रांचा समावेश होतो.
  1. अर्ज :- हा अर्ज तलाठी यांना दिला जातो या अर्जाध्ये मयत व्यक्तीची माहिती त्याचे वारस अर्जदार, सर्व वरसांची माहिती (नाव, मयताशी नाते) दिली जाते व शेत जमिनीचे विवरण सांगून वारसा फेर घेण्याची विनंती केली जाती.
  2. जाहिर प्रगटण :- हे जाहिर प्रगटण ग्रामपंचायत च्या नोटीस बोर्ड वर लावले जाते त्यावर पाच पंचाच्या सह्या घेतल्या जातात त्यामध्ये वरील वारसाचे विवरण दिले जाते तसेच काही आक्षेप असल्यास 15 दिवसाच्या आत तलाठी कार्यालयास संपर्क करण्यास संगितले जाते. 
  3. पंचनामा :- पाच पंच्यांच्या साहिणी हा पंचनामा तयार केला जातो या मध्ये देखील मयत व्यक्ती व त्याचे सर्व वारस यांची माहिती दिलेली असते.
  4. वारसा प्रमाणपत्र :- हे प्रमाणपत्र कडून मिळते या प्रमाणपत्रा मध्ये उप सरपंच, सरपंच, पोलीस पाटील व ग्राम सेवक हे मयत व्यक्ती व त्यांचे वारस यांची माहिती देऊन सह्या करतात.
  5. नमूना नंबर 9 :- नमूना नंबर 9 मध्ये नोटीस दिली जाते की वरील विवरणाचा वारसा फेर अर्ज आलेला आहे काही आक्षेप असल्यास 15 दिवसाच्या आत कळवावे. आक्षेप न आल्यास फेफार नोंद मंजूर करण्यात येईल. 
  6. फेरफार अर्ज :- फेफार अर्जाच्या माहिती साठी क्लिक करा.
या फाईल सोबत मयत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र व 100 रूपयाच्या बॉन्ड पेपर वर वरसांचे शपथ पत्र जोडावे लागते. अशा या महत्वाच्या वारसा फेर फाईलची सांचीका PDF स्वरुपात देत आहे. तसेच महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.


                                                                      
Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !