प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत GENRETED PRIORITY LIST ठराव प्रपत्र अ, ब व क PDF

    प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत GENRETED PRIORITY LIST [प्रपत्र ड] मधील  लाभार्तीची  संवर्ग निहाय शिफारस व पात्र, अपात्र कुटुंबाची प्राधान्य क्रम यादी तयार केली जात आहे. प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत अनेक अर्ज शासनास प्राप्त झाले आहे परंतु सर्वांना लाभ देणे शक्य नसून अपात्र अर्जदार वगळले जाणार आहेत. तुम्ही जर प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत अर्ज केलेला असेल तर तुम्हाला या अटी, निकष पाहणे गरजेचे आहे कारण त्यातून तुमचे नाव वागळे जाऊ शकते. प्रधानमंत्री आवास+डाटाबेस मधील लाभार्थीची संवर्ग निहाय शिफारस व पात्र, अपात्र ठरविण्याचे निकषां बाबत शासन परिपत्रक क्र.प्रम.आयो.जी.2021/प्रा.क्र.71/योजना-10 ग्रामविकास व जलसंधारण विभाग बांधकाम विभाग भवन, 25 माझवान रोड, फोर्ट, मुंबई-400001 दि. 30 ऑगस्ट 2021 चे नुसार पात्र/अपात्रतेचे निकष खलील प्रमाणे आहेत. 

  • पात्रता निकष :-

1.  निवास नसलेली कुटुंबे.

2.  निराधार/अपंग/विधवायांची कच्ची घर असलेली कुटुंबे.

3.  हाताने सफाई कामगार असलेली कुटुंबे.

4.  आदिम अदिवासी असलेली कुटुंबे.

5.  कायदेशीररित्या कामगार/मजूर.


  • अपात्रतेचे निकष :-

1.  2/3/4 चाकी मोटर सायकल असलेली कुटुंबे.

2.  यांत्रीकृत 3/4 चाकी (मोठी वाहने) कृषी उपकरणे असलेली कुटुंबे.

3.  किसान क्रेडीट कार्ड क्रेडीटसह 50,000 रु. किवां त्यापेक्षा जास्त मर्यादा.

4.  कुटुंबातील कोणताही  सदस्य सरकारी कर्मचारी असलेली कुटुंबे.

5.  अकृषिक कुटुंबे ज्याची नोंदणी शासकीय उपक्रमात असेलेली कुटुंबे.

6.  कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा रु.10,000 पेक्षा जास्त कमवता आहे.

7.  आयकर देय असलेली कुटुंबे.

8.  व्यावसायिक कर देय असलेली कुटुंबे.

9.  रेफ्रीजरेटर मालक असलेली कुटुंबे.

10.   लँडलाईन फोनचा  मालक असलेली कुटुंबे.

11.   2.5 एक्कर पेक्षा  जास्त बागायवती जमिनीची मालक असलेली कुटुंबे.

12.   5 एक्कर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन असलेली कुटुंबे.

13. 7.5 एक्कर किंवा त्याहून अधिक जमिनीची मालकी किमान एक सिंचन उपकरणासह असलेली कुटुंब.

वरील निकषानुसार पात्र, अपात्र अर्जदारची यादी तयार केली जाणार आहे. ही यादी सरपंचग्रामसेवकविस्तार अधिकारी /ग्रामसभेसाठी उपस्थित प्रभारी अधिकारी यांच्या ठरवानुसार तयार करण्यात येत आहे. ठरावाचा नमूना व प्रपत्र अ, ब व क ची PDF लिंक खाली देत आहे. त्यानुसार तुम्हाला लाभार्थी प्राधान्य क्रम समजण्यास सुविधा होईल.



                                    
Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !