Parishisht 7 Thibak, Tushar Sinchan Sadhnane Hamipatr / परिशिष्ट 7 ठिबक, तुषार सिंचन साधने हमीपत्र PDF
आपण महाडीबीटी (MAHA-DBT) या शासकीय साईट वर ठिबक, तुषार सिंचन साधने सबसिडी मिळणे बाबतअर्ज केला असेल आणि आपण पात्र झाला असाल तर हे हमीपत्र आपल्याला उपयोगी आहे. ते भरून तुम्हाला अपलोड करावे लागते. या हमीपत्रावर शेतकर्याचा फोटो चिटकऊन त्याचे नाव, पत्ता, दिनांक, सर्वे/ गत नंबर, तसेच पुर्वसंमती मिळाल्याचे नमूद केले जाते त्यासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतात.
- ७/१२ उतारा ( मालकी हक्कासाठी)
- ८अ उतारा (एकुण क्षेत्राच्या माहितीसाठी)
- कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सुक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र
- बिलाची मुळ प्रत (टॅकस ईनव्हाईस)
तसेच शेतकरी खलील बाबींची हमी देतो :-
- मी कागदपत्र सोबत जोडलेली असून ती सर्व माहिती/कामदपत्रे बरोबर आहेत. याची सर्व जबाबदारी माझी राहिल.
- सदर ठिबक/तुषार सिंचनाच्या साठी आवश्यक असलेली सिंचनाची सोय: विहीर / कॅनाल /शेततळे/सामुदायिक सिंचन सुविधा/ माझ्याकडे उपलब्ध आहे.
- ठिबक/तुषार सिंचन संचासाठी आवश्यक असलेली उर्जा साधने पुढीलपैकी.................. (विदयुत मोटर्स/डिझेल/सोलर) माझ्याकडे उपलब्ध असुन अधिकृत विद्युत जोडणीची सुविधा माझ्याकडे उपलब्ध आहे.
- ज्या क्षेत्रासाठी ठिबक/तुषार अनुदानासाठी अर्ज केलेला आहे त्या क्षेत्रावर यापुर्वीच्या ७ वर्षामध्ये मी शासनाच्या कोणत्याही योजनेतुन ठिपक/तुषार संचाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नाही.
- ज्या क्षेत्रासाठी ठिबक/तुषार सिंचन संचाच्या अनुदानाची मागणी केलेली आहे त्यासह मी एकूण ५ हे.क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रासाठी तसेच माझ्या एकूण जमीन धारणेपैकी (८-अ नुसार) जास्त क्षेत्रासाठी ठिबक/तुषार सिंचन अनुदानाचा लाभ घेत नाही.
- संयुक्त ७-१२ मध्ये इतर खातेदारांकडून काही वाद निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी माझी राहील.
- बिलामध्ये नमूद सर्व साहित्य मला प्राप्त झाले असून ते योग्य दर्जाचे असल्याचे मी खात्री करुन ते स्विकारले असून त्याबाबत माझी काही तक्रार नाही.
- अनुदान ठिबक/तुषार संचासाठी प्राप्त झाल्यानंतर पुढील ५ वर्षापर्यंत सदर संच सुस्थितीत ठेवण्याची व वापरात ठेवण्याची माझी जबाबदारी असुन मी त्यांची अथवा त्यातील कोणत्याही भागाची विक्री करणार नाही.
- ठिबक/तुषार सिंचन संचाच्या उत्पादक कंपनीच्या इंजिनियरने करुन दयावयाच्या आराखड्यासाठी आवश्यक कागदपत्रे/माहिती, उदा. माती, पाणी परिक्षण अहवाल, विदयुत मोटर /डिझेल इंजिन क्षमता, सिंचन सुविधेपासुन ठिबक/तुषार संचाचे अंतर, हेड, घ्यावयाचे/घेत असलेले पिक, पाणी उपलब्धता इ. सर्व तांत्रिक बाबींची माहिती त्यांना उपलब्ध करुन दयायची जबाबदारी माझी असुन त्यानुसार त्यांनी आराखडा तयार करुन दिलेला आहे.
- उत्पादक कंपनी किंवा त्यांचे प्रतिनिधीसोबत विहित नमुन्यातील साध्या कागदावर करारनामा मी करुन घेतला असुन तो माझ्याकडे ठेवलेला आहे.
- अंमलबजावणी यंत्रणेच्या अधिका-यांना सदरचा संच तपासणी करण्यासाठी माझी मुभा आहे. मी संच तपासणीसाठी कोणत्याही प्रकरचा अडथळा अथवा हरकत करणार नाही. तपासणीसाठी अडथळा अथवा हरकत केल्यास मी अनुदान मिळण्यास अपात्र राहीन/ चुकीचा प्रस्ताव करुन अनुदान काढले असल्यास मिळालेले अनुदान माझ्याकडून वसुल करण्यात येईल याची मला जाणीव आहे.
- प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेत सुक्ष्म सिंचन घटकाचा लाभ मिळणेसाठी मी सादर केलेली कागदपत्रे खरी आहेत.
या सर्व बाबी मान्य करून शेतकरी व दोन साक्षीदार या हमी पत्रावर सही करतील त्यांचे मोबाईल क्रमांक स्थळ व दिनांक त्यावर नमूद केला जाईल.
अशा महत्वाच्या हमीपत्राची PDF फाईल लिंक देत आहे.
* PDF फाईल लिंक :- परिशिष्ट 7 ठिबक, तुषार सिंचन साधने हमीपत्र PDF
Join Telegram :- https://t.me/mazedakhle
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
धन्यवाद !
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know