Aadhar Update or Correction Form / आधार नोंदणी, दुरुस्ती फॉर्म 

आपल्या दैनंदिन जीवनात विविध कागदपत्रे तसेच दाखले मिळवण्यासाठी आपणास बराच त्रास सोसावा लागतो मात्र आता हे सर्व दाखले आपणास एकाच ठिकाणी मिळावे अशी व्यवस्था आम्ही करत आहोत. सर्वात महत्वाचा फॉर्म आहे आधार नोंदणी व दुरूस्ती करिता वापरण्यात येणारा फॉर्म खाली उपलब्ध आहे. तसेच तो कसा भरावा याचा डेमो फॉर्म सुधा आहे. अजून काही माहिती हवी असल्यास कमेंट करा धन्यवाद !

* PDF फाइल लिंक सोबत देत आहोत :-




1) Certificate for Aadhaar Enrollment/Update हा फॉर्म कसा भरावा :- 
  • हा फॉर्म भरताना निळ्या किंवा काळ्या शाईचा बॉल पॉइंट पेन वापरावा.
  • सर्व फॉर्म इंग्रजी कॅपिटल अक्षरात भरावा.
  • सर्वात वर दिनांक आधार केंद्रात दुरुस्ती किंवा नवीन नोंदणी करत असतानाच टाकावा.
  •  रेसिडेंट Resident पर्यायाला टिक करावे.
  • आपण नवीन नोंदणी करत असाल तर न्यू ईनरॉलमेंट (New Enrollment) वर टिक करावे अन्यथा दुरुस्ती करत असाल तर अपडेट (Update) वर टिक करा.
  • आधार नंबर कॉलम मध्ये ज्या व्यक्तीचे आधार दुरुस्त करावयाचे आहे त्याचा आधार नंबर नोंदवावा. नवीन नोंदणी साठी आधार नंबर लिहिणे आवश्यक नाही.
  • Full Name मध्ये ज्या व्यक्तीचे आधार काढावयाचे आहे किंवा दुरुस्त करावयाचे आहे त्याचे संपूर्ण नाव इंग्रजी कॅपिटल अक्षरात भरावे नाव वडीलाचे किंवा पतीचे नाव आडनाव भरताना दोन नावांमध्ये एक चौकट रिकामी सोडावी.
  • C/o मध्ये वडिलांचे किंवा पतीचे संपूर्ण नाव लिहावे.
  • House No./Bldg./Apt. मध्ये घर नंबर, बिल्डींग नंबर, अपार्टमेंट नंबर असेल तर लिहावा.
  • Street/Road/Lane मध्ये आपल्या घराजवळील रोड चे नाव किंवा गल्ली नंबर लिहावा.
  • Landmark मध्ये घरा जवळील महत्वाची खून किंवा ठिकाण लिहावे.
  • Village/Town/City मध्ये गावचे नाव, शहराचे नाव, तालुका जो असेल तो लिहावा.
  • District समोर तुमचा जिल्हा लिहावा.
  •  State समोर तुमचे राज्य लिहावे.
  •  PIN Code समोर तुमचा पोस्टल पिन कोड लिहावा.
  • Date of Birth समोर DD MM YYYY या फॉरमॅट मध्ये जन्म दिनांक लिहावा.
  • Signature of the Resident/ Thumb/ Finger Impression बॉक्स मध्ये ज्या व्यक्तीची आधार नोंदणी किंवा दुरुस्ती करावयाची असेल त्या व्यक्तीने स्वाक्षरी करावी व्यक्ती निरक्षर असेल तर अंगठ्याचा ठसा द्यावा. अज्ञान बालकाचे आधार काढताना पालकांची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा घ्यावा.
  •  फोटोसाठी दिलेल्या चौकटीत ज्या व्यक्तीची आधार नोंदणी किंवा दुरुस्ती करावयाची असेल त्या व्यक्तीचा पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवावा.
  • उर्वरित भाग हा Certifier म्हणजेच प्रमाणीकरण देणाऱ्या पदाधिकारी यांच्या द्वारे भरला जातो.
  • त्यामध्ये प्रमाणीकरण देणाऱ्या पदाधिकाऱ्याचे नाव, पद, कार्यालयाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक लिहीला जातो.
  • आता प्रश्न निर्माण होते प्रमाणीकरण कोणाचे घ्यावे तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर सरपंचाचे शहरी भागात राहत असाल तर नगर सेवक यांचा शेवटच्या चौकटीत ठळक सही व शिक्का घ्यावा डेमो फॉर्म मध्ये दाखवल्या प्रमाणे फोटोवर सुद्धा ठळक सही व शिक्का घ्यावा.
  • याव्यतिरिक्त प्रामाणिकरन देणारे अधिकारी खालील प्रमाणे आहे.
  • Gazetted Officer - Group A राजपत्रित अधिकारी गट अ, Gazetted Officer - Group B राजपत्रित अधिकारी ग्रुप ब, Village Panchayat Head or Mukhiya सरपंच, MP/ M.L.A. / M.L.C. / Muncipal Councilor खासदार/ आमदार/ एमएलसी / नगर पालिका, Tehsildar तहसीलदार,Head of Recognized Educational Institution मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे प्रमुख (उदा. प्राचार्य),  Superintendent/ Warden/ Matron/ Head of Institution of Recognized shelter homes/ Orphanages अधिक्षक / वॉर्डन / मॅट्रॉन / मान्यताप्राप्त निवारागृहे / अनाथाश्रमांचे संस्था प्रमुख, EPFO Officer ईपीएफओ अधिकारी.
  • Checklist for Certifier :- No overwriting, Issue date is filled, Resident's signature, Certifier's details, Resident's Photo is cross signed and cross stamped (paper to photo or photo to paper) यामध्ये सर्व चेक बॉक्स मध्ये बरोबर टिक करावे.

                                                                          
Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा, नियमित पोस्ट मिळण्यासाठी टेलिग्राम जॉईन करा.

धन्यवाद !