फेरफार, 7/12, होल्डींग, 8 अ नक्कल चे जुने नमुने / Ferfar, 7/12, 8 A Nakkl Che June Namune PDF
वरील सर्व नक्कल नमुने आता कालबाह्य होत आहेत. तरी आपण त्यांच्या PDF फाईल जतन केल्या पाहिजे कारण त्यावरून आपल्याला ऑनलाईन नमुने समजून घेणे सोपे जाते. आता एक-एक नमुन्यांची आपण सविस्तरपणे माहिती घेऊ तसेच हे नसमुने ऑनलाइन कसे डाउनलोड करायचे याची माहिती घेऊ.
1) फेरफार :-
पूर्वी जमीन वक्री खरेदी इत्यादी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मार्फत केली जात असे आता मात्र रजिस्ट्री कार्यालयात जाऊन हे सर्व व्यवहार करावे लागत आहेत. त्याची फक्त नोंद घेण्याचे अधिकार आता तलाठी यांच्याकडे हय. फेरफार रजिस्टर हे अतिशय महत्वाचे रेकॉर्ड असते त्यामध्ये तलाठी गावातील सर्व जमिनीचे खरेदी, विक्री, नामांतर, दान, वारसा, जमीन तारण, बोजा इत्यादी ची नोंद घेत असतो. प्रत्येक 7/12 मधील बदलाला किंवा नवीन नोंदीला विशिष्ट फेरफार अनुक्रमांक दिला जातो. उदाहरणार्थ वारसाने वाडीलाची जमीन मुलाच्या नावाने केल्यानंतर वडिलांचे 7/12 वरील नाव कमी करून मुलाचे नाव तेथे नोंदवले जाते त्या नोंदीला एक विशिष्ट फेर क्रमांक दिला जातो व त्याची नोंद फेरफार रजिस्टर वर घेतली जाते. बँकेत पीककर्ज देताना फेरफार नक्कल ही मागितली जाते. फेरफार नक्कल देने अनिवार्य असते त्यातून बँकेस समजते की सदरील जमीन कर्जदाराच्या नावे कशी आलेली आहे.
आता पाहू फेरफार नक्कल कशी मिळवावी फेरफार खुप जुना असेल आणि त्याचे रेकॉर्ड नष्ट झाले असेल तर ''नऊ तीन नऊ चार'' ची नक्कल दिली तरी चालते ती सुद्धा मिळत नसेल तर तहसिल कार्यालय लेखी स्वरूपात आपणास रेकोर्ड जीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देते. ते सुध्दा बँकेस पीक कर्ज देताना मान्य करावे लागते. तसेच तहसिल मध्ये रेकॉर्ड उपलब्ध असल्यास त्याची सत्यप्रत सही शिक्यानिशी आपल्याला दिली जाते. फेरफार रजिस्टर तलाठ्याजवळ असेल तर तलाठी सही शिक्का करून त्याची नक्कल देतो. आताच्या तारखेत नवीन झालेले फेर हे ऑनलाईन उपलब्ध आहेत त्याची लिकं खाली देत आहे. आपल्या फेरची नोंद ऑनलाईन तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांच्या मार्फत झाली की 15 रु. चे ऑनलाईन पेमेंट करून आपला डिजिटल स्वाक्षरी असलेला फेर आपल्याला डाउनलोड करून त्याची प्रिंट काढता येते. ऑनलाईन फेरफार कसा काढावा लॉगिन कसे करावे याची संपुर्ण माहिती पुढील ब्लॉगवर देण्यात येईल.
2) होल्डींग, 8 अ :-
होल्डिंग किंवा 8 अ ही एखायद्या व्यक्तीच्या नवे गावात सर्व गट मिळून एकूण किती जमीन आहे. याची नोंद केलेली असते. त्यात गावाचे नाव सर्व्हे, गट नंबर एकूण क्षेत्र हेक्टर आर व आकार रुपय पैसे मध्ये नोंद असते. म्हणून व्यक्तीच्या एकूण धारण जमिनीची नोंद यात असते असे म्हणता येईल. 8 अ आपल्याला तलाठी यांच्या मार्फत मिळते. आता सर्व 8 अ रेकॉर्ड हे ऑनलाईन केले जात आहे. त्यानंतर 15 रू. चे ऑनलाईन पेमेंट करून डिजिटल स्वाक्षरी चा 8 अ उतारा डाउनलोड करून त्याची प्रिंट काढता येऊ शकेते. आपला 8 अ उतारा ऑनलाईन कसा पहावा तसेच डिजिटल स्वाक्षरी चा 8 अ उतारा डाउनलोड करण्याची लिंक खाली देत आहे. त्याचे लॉगिन कसे करावे पेमेंट कसे करावे याची माहिती पुढील ब्लॉगवर दिली जाईल.
3) गाव नमुना सात/ बारा, 7/12 :-
या अभिलेख पत्रकात गाव नमुना सात मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार आणि अभिलेख नोंदवही (तयार करणे व सुविधा ठेवणे) नियम 1971 यातील नियम 3,5,6, आणि 7 नुसार गाव, तालुका, जिल्हा तसेच भूमापन क्रमांक, भूमापन क्रमांकाचा उपविभाग, भूधारन पद्धत, शेतीचे स्थानिक गाव, लागवडी योग्य क्षेत्र हेक्टर-आर, जमीन आकार रुपये-पैसे मध्ये, लागवडी लायक नसलेले क्षेत्र म्हणजेच पोटखराब, भोगवटदाराचे नाव, त्याचा खाते क्रमांक, फेर क्रमांक, खंड, कुळाचे नाव, इतर अधिकार, विहिरीची नोंद व कर्जाची नोंद सीमा आणि भूमापन चिन्ह आशा सर्व बाबींची नोंद केलेली असते.
तसेच गाव नमुना 12 मध्ये पिकांची नोंदवही महाराष्ट्र महसूल जमीन अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुधारित ठेवणे) नियम 1971 यातील नियम 29 नुसार पिकाखालील क्षेत्रांचा तपशील, वर्ष, हंगाम, मिश्र पिकाचे एकूण क्षेत्र, मिश्र पिकातील प्रत्येक पिकाचे क्षेत्र, अमिश्र पिकाचे क्षेत्र, पडीत व पिकास निरुपयोगी जमिनीचा तपशील, पाणी पुरवठ्याचे नाव, जमीन करणाऱ्याचे नाव, शेरा, पिक जलसिंचित किंवा अजलसिंचित आहे याची नोंद असते. हे दोन्ही मिळून 7/12 चा उतारा तयार होतो. 7/12 उतारा आपल्याला तलाठी यांच्या मार्फत मिळते. आता सर्व 7/12 रेकॉर्ड हे ऑनलाईन केले जात आहे. त्यानंतर 15 रू. चे ऑनलाईन पेमेंट करून डिजिटल स्वाक्षरी चा 7/12 उतारा डाउनलोड करून त्याची प्रिंट काढता येऊ शकेते. आपला 7/12 उतारा ऑनलाईन कसा पहावा तसेच डिजिटल स्वाक्षरी चा 7/12 उतारा डाउनलोड करण्याची लिंक खाली देत आहे. त्याचे लॉगिन कसे करावे पेमेंट कसे करावे याची माहिती पुढील ब्लॉगवर दिली जाईल.
Join Telegram :- https://t.me/mazedakhle
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
धन्यवाद !
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know