प्रपत्र - १ (ब) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प शेतकऱ्याने द्यावयाचे हमीपत्र POCRA
लाभार्थ्यास POCRA अंतर्गत ठिबक / तुषार संच खरेदिस पूर्वसंमती मिळाल्या नंतर व तो बसविल्या नंतर मंजूर अनुदान प्राप्त करण्यासाठी हे हमीपत्र द्यावे लागते. याच प्रमाणे याआधी आपण MAHA-DBT साठी लागणार्या हमीपत्राची माहिती सुद्धा घेतलेली आहे. या हमी पत्रावर लाभार्थ्याचे पासपोर्ट साईज छायाचित्र लाऊन नाव, पत्ता, शेती विषयी माहिती देऊन खलील मुद्यानुसार हमीपत्र द्यावे लागते.
१) मी खालीलप्रमाणे कागदपत्र सोबत जोडलेली असून ती सर्व माहिती / कागदपत्रे बरोबर आहेत. याची सर्व जबाबदारी माझी राहील.
१. शेतकऱ्यांचे हमीपत्र.
२. शेतकऱ्याने केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत.
३. ७/१२ उतारा (मालकी हक्कासाठी)
४. ८ अ उतारा (एकूण क्षेत्राच्या माहितीसाठी)
५. कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सूक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र.
६. बिलाची मूळ प्रत (टॅक्स इनव्हाईस)
२) सदर ठिबक / तुषार सिंचनाच्या साठी
आवश्यक असलेली सिंचनाची सोय: विहीर / कॅनाल / शेततळे सामुदायिक सिंचन सुविधा /
माझ्याकडे उपलब्ध आहे.
३) ठिबक / तुषार सिंचन संचासाठी आवश्यक
असलेली उर्जा साधने पुढीलपैकी .......................... पंप (विद्युत मोटर्स /
डिझेल / सोलर) माझ्याकडे उपलब्ध असून अधिकृत विद्युत जोडणीची सुविधा उपलब्ध आहे.
४) ज्या क्षेत्रामध्ये ठिबक / तुषार
सिंचन अनुदानासाठी अर्ज केलेला आहे त्या क्षेत्रावर यापूर्वीच्या ७ वर्षामध्ये मी
शासनाच्या कोणत्याही योजनेतून ठिबक / तुषार संचाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नाही.
५) ज्या क्षेत्रासाठी ठिबक / तुषार सिंचन
संचाच्या अनुदानाची मागणी केलेली आहे त्यासह मी एकूण २ हे. क्षेत्रापेक्षा जास्त
क्षेत्रासाठी तसेच माझ्या एकूण जमीन (८ अनुसार) जास्त क्षेत्रासाठी ठिबक / तुषार
सिंचन अनुदानाचा लाभ घेत नाही.
६) संयुक्त ७/१२ मध्ये इतर खातेदारांकडून
काही वाद निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी माझी राहील.
७) बिलामध्ये नमूद सर्व साहित्य मला
प्राप्त झाले असून ते योग्य दर्जाचे असल्याचे मी खात्री करून ते स्वीकारणार
आहे.
८) अनुदान ठिबक / तुषार संचासाठी प्राप्त
झाल्यानंतर पुढील ५ वर्षापर्यंत सदर संच सुस्थितीत ठेवण्याची व वापरात
ठेवण्याची माझी जबाबदारी असून मी त्यांची अथवा त्यातील कोणत्याही भागाची विक्री
करणार नाही.
९) ठिबक/तुषार सिंचन संचाच्या उत्पादक
कंपनीच्या इंजिनीयरने करून द्यावयाच्या आराखड्यासाठी आवश्यक कागदपत्रे /
माहिती, उदा. माती / पाणी परीक्षण अहवाल, विदयुत मोटर / डिझेल इंजिन क्षमता, सिंचन
सुविधेपासून ठिबक / तुषार संचाचे अंतर, हेड, घ्यावयाचे/ घेत असलेले पिक, पनीए उपलब्धता इ. सर्व
तांत्रिक बाबींची माहिती त्यांना उपलब्ध करून द्यायची जबाबदारी माझी असून त्याबाबत
पूर्तता केल्यानंतर त्यानुसार त्यांनी आराखडा तयार करून दिलेला आहे.
१०) वितरकासोबत विहित नमुन्यातील करारनामा मी करून घेतला असून तो माझ्याकडे ठेवलेला आहे. वरील सर्व माहिती मी सत्यप्रतीज्ञेवर प्रमाणित करून देत आहे. सदर माहिती खोटी अढळून आल्यास त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे. तरी अर्जाचा अनुदानासाठी विचार करावा.
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know