बँक खाते बंद करणे बाबत अर्ज / Application for bank account closure PDF
बँकेसंबंधीत विविध अर्जाचे नमुने या आधीच्या पोस्ट मध्ये आपण पाहिले आहेत. याच संदर्भातील आणखी एक अर्ज आहे तो म्हणजे खाते बंद करण्या बाबत अर्ज खाते बंद का करावे लागले त्याची कारणे खलील प्रमाणे असू शकतात.
1) अनावश्यक खाते :- जी खाती कुठल्याही आर्थिक व्यवहारासाठी आपण वापरत नाहीत आणि भविष्यात देखील वापरात येणार नाहीत असे खाते अनावश्यक असतात ती बंद करणे योग्य असते.
2) अतिरिक्त शुल्क आकारणी :- काही खाजगी बँक ह्या खाते धारकांना बचत ठेव, डेबिट व क्रेडिट कार्ड सारख्या ईतर सुविधांचे कारण दाखवून अतिरिक्त शुल्क वसूल करतात मात्र त्याच सुविधा राष्ट्रीयकृत बँक ह्या माफक दरात उपलब्ध करून देतात यामुळे अशी खाती बंद करावी लागतात.
3) विलीनीकरण :- बँकेचे विलीनीकरनाचे एक मोठे उदाहरण म्हणजे SBH व SBI बँकेचे झालेले विलीनीकरण ज्या व्यक्तीचे या दोन्हीही बँकेत बचत खाते होते त्यांचे एक खते अतिरिक्त ठरले आहे व ते बंद करावे लागणार आहे.
4) अविश्वास :- पंजाब नॅशनल बँक, YES बँक सारख्या मोठ्या बँकेचे घोटाळे समोर आल्यामुळे खाते धारकांमध्ये अविश्वास निर्माण होतो आणि खाते बंद केली जातात.
* टीप :- वरील अर्जा सोबत मूळ बँक पासबुक, चेक बुक (असेल तर) व खाते धारकाच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत देणे आवश्यक आहे. खात्या मध्ये काही रक्कम जमा असल्यास ती रक्कम चालना द्वारे आपल्या चालू खात्यात वर्ग करून घ्यावी किंवा काढून घ्यावी.
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know