शिष्यवृत्ती अर्जासोबत विद्यार्थी व पालकांनी द्यावयाचे बंधपत्र (Indemnity Bond)
या पूर्वीच्या पोस्ट मध्ये आपण 1) शिष्यवृत्ती अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राची चेक लिस्ट / Checklist of Documents for Scholarship Application PDF व
2) शिष्यवृत्ती करिता पालकांचे प्रतिज्ञापत्र PDF या फॉर्म विषयी माहिती घेतली यांच्या सोबत आणखी एक बंधपत्र जोडावे लागते त्यामध्ये पालक व अर्जदार खलील प्रमाणे हमी देतात.
(ब) विद्यार्थी व पालकांनी द्यावयाचे बंधपत्र (Indemnity Bond):-
- मी / आम्ही खाली सही करणार / करणारे प्रतिज्ञापन करतो की, शिष्यवृत्ती मिळण्याबाबत शासनाने विहीत केलेल्या अटी व शर्ती मला / आम्हाला मान्य आहेत. अर्जात वरीलप्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती पूर्णपणे सत्य आहे. सदरची माहिती खोटी अथवा अपुरी आढळल्यास भारतीय दंडविधाना प्रमाणे होणाऱ्या दंडास / शिक्षेस मी / आम्ही पात्र आहे / आहोत. अर्जात नमूद केलेल्या माहितीपैकी कोणतीही माहिती वा निवेदन चुकीचे आढळून आल्यास सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला निर्णय अंतिम असेल व तो माझ्यावर / आम्हावर बंधनकारक असेल, अशी मी / आम्ही हमी देतो. जर शिष्यवृत्तीची, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची रक्कम अनुज्ञेय रक्कमेपेक्षा अधिक मिळाली तर मी / आम्ही ती शासनास जमा करु, अशी जास्तीची अथवा अन्य कारणामुळे वसूल करण्यात येणारी रक्कम मी / आम्ही पूर्णपणे शासनास परत करण्याची हमी देतो.
- माझ्या कुटुंबाच्या उत्पन्नाची व जातीची अर्जात नमूद केलेली माहिती खोटी आढळल्यास माझ्या / माझ्या पाल्याच्या विरुध्द होणाऱ्या कारवाईस मी/ आम्ही स्वत: जबाबदार राहू.
- मी अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे, मी सक्षम अधिकाऱ्याकडून / प्राधिकाऱ्याकडून प्राप्त केलेली असून, ती कागदपत्रे खरी असून योग्य मार्गाने मिळविलेली आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार / दुरुस्ती/ बदल केलेला नाही. सदरील कागदपत्रे, प्रमाणपत्रे खोटी अथवा नकली नाहीत हे मी सत्य प्रतिज्ञेवर लिहून देतो. अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे, प्रमाणपत्रे खोटे अथवा बनावट आढळल्यास त्यास मी / आम्ही पुर्णत: जबाबदार असून त्यासाठी भारतीय दंड विधान कायदा कलम १९९ व २०० नुसार लागू होणाऱ्या शिक्षेस मी/आम्ही पात्र राहू, याची मला/आम्हाला पुर्ण जाणीव आहे.
- सन 20 - (येथे चालू शैक्षणिक वर्ष लिहावे) या वर्षाची शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क व इतर शुल्काची रक्कम माझ्या आधार संलग्न बॅन्क खात्यावर जमा होताच, त्यापैकी महाविद्यालयास देय असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची रक्कम सात दिवसात महाविद्यालयात जमा करुन त्याची रितसर पावती प्राप्त करुन घेण्याची माझी / आमची जबाबदारी असेल. शुल्क महाविद्यालयास जमा न केल्याने भविष्यात उद्भवणार्या परिणामास मी/आम्ही वैयक्तीक जबाबदार असु असे प्रतिज्ञापुर्वक हमीपत्र / बंधपत्र मी / आम्ही सादर करीत आहोत.
या बंधपत्राची PDF फाईल लिंक खाली देत आहे. तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्राच्या अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.
* PDF फाईल लिंक:- शिष्यवृत्ती अर्जासोबत विद्यार्थी व पालकांनी द्यावयाचे बंधपत्र (Indemnity Bond) PDF
Join Telegram :- https://t.me/mazedakhle
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
धन्यवाद !
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know