ई - मस्टर मागणी अर्ज, म.गां.रा.रो.ह.यो. रोजगार मागणी अर्ज नमूना 4, Bill Form No. 29 PDF
आपल्याला जर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र अंतर्गत विहीर, फळबाग सारख्या योजनेचा लाभ मिळत असेल. तेव्हा हे अर्ज, फॉर्म आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. या योजने अंतर्गत अनुदान हे टप्प्या-टप्प्यात मिळते व ही मंजूर झालेली कामे करणार्या मजुरांच्या खात्यात अनुदानित रक्कम वेळोवेळी जमा केली जाते.
* ई - मस्टर मागणी अर्ज:- या अर्जाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे मस्टर मागणी केली जाते. यात कामाचे नाव, कामाचा संकेतांक व लागणार्या मजुरांची संख्या दिली जाते. या अर्जावर ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, तांत्रिक सहाय्यक, शाखाअभियंता/ उपअभियंता/ विस्तार अधिकारी इत्यादि यांच्या शिफारस म्हणून साह्य घेता येतात. या अर्जा बरोबर नमून नं. 4 हा फॉर्म जोडावा लागतो त्याची माहिती खलील प्रमाणे आहे.
* म.गा.रा.रो.ह.यो. रोजगार मागणी अर्ज नमूना 4:- या फॉर्म मध्ये मस्टर चा कालावधी म्हणजेच एकूण कामाचे दिवस नोंदवावे लागतात. तसेच कामाची मागणी करणार्या मजुराचे नाव, जॉब कार्ड क्रमांक, बँकेचा खाते क्रमांक, आधार क्रमांक व त्यांची सही असा तपशील दिला जातो.
* Bill Form No. 29:- हा फॉर्म आपल्याला आपल्या कामाच्या एम. बी. वर जोडावा लागतो यावर वेळोवेळी तांत्रिक सहाय्यक/अभियंता यांच्या मार्फत कामासंबंधी झालेल्या खर्चाचा तपशील लिहिला जातो.
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know