बँक खात्याला मोबाईल नंबर जोडणे/ बदलणे व SMS सुविधा सुरु/ बंद करणे बाबत अर्ज PDF
दैनंदिन जीवनात बँकेशी व्यवहार करताना विविध अर्जांची गरज भासते त्याच्याशी निगडीत सर्व प्रकारचे अर्ज टप्प्या-टप्प्यात उपलब्ध करून देत आहे. यामध्ये खालील प्रकारचे अर्ज आपल्या नेहमी उपयोगात येणारे आहेत.
1) बँक खात्यास मोबाईल नंबर जोडणे/ बदलणे :- आपल्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक (जोडलेला) असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचा उपयोग आपल्या खात्यात होत असलेल्या व्यवहाराची माहिती घेण्या करिता होतो. तसेच फोन पे, G पे, भीम, PayTM, इत्यादी UPI पेमेंट सुविधांचा लाभ घेता येतो. Internet Banking सुविधा सुरु करणे सुलभ होते. बँक खात्याला मोबाईल नंबर जोडण्याचे असे अनेक फायदे आहेत.
2) SMS सुविधा सुरु करणे :- SMS सुविधा (अलर्ट) सुरु करण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत यामुळे आपल्या खात्यात जमा, शिल्लक, कमी केली जात असलेली रक्कम अशा सर्व बाबींची माहिती SMS द्वारे आपल्याला मिळते.
3) SMS सुविधा बंद करणे :- कुठल्याही कारणास्तव आपल्या बँक खात्याशी जोडलेले मोबाईल नंबर SIM गहाळ झाले असेल तर तत्काळ त्या नंबर वर सुरु असलेल्या SMS सुविधा बंद करणे गरजेचे असते. मात्र हे खाते नियमित वापरात असेल तर आपला चालू मोबाईल नंबर जोडून त्यावर SMS सुविधा सुरु करून घेणे हितकारक असते.
* टीप :- वरील सर्व अर्जा सोबत बँक पासबुक व खाते धारकाच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे.
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know