विभक्त कुटूंब प्रमाणपत्र / Nuclear Family Certificate PDF

    यापूर्वी आपण विभक्त कुटुंबा बाबत स्वयंघोषणापत्राची माहिती घेतलेली आहे. मात्र आज ज्या प्रमाणपत्रा बद्दल आपण माहिती घेणार आहोत ते प्रमाणपत्र ग्रामपंचायत तर्फे ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्फत दिले जाते. काही सरकारी योजनांचा लाभ कुटुंबातील दोन व्यक्तीला घेता येत नाही मात्र संदर्भ: महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- आरटीअएस:- 2018/ प्र.क्र.145/:-आस्था दिनांक :- 13/02/2019 नुसार कुटुंबातील व्यक्ती विभक्त झालेले असतील आणि स्वतंत्र उदरनिर्वाह करत असतील तर त्यांना अशा योजनांचा लाभ हा घेता येऊ शकतो. त्यासाठी हे  विभक्त कुटुंबाचे प्रमाणपत्र आपल्या योजनेच्या फाईल सोबत जोडता येऊ शकते. या प्रमाणपत्रा मध्ये लाभार्थ्याचे नावआधार कार्ड क्रमांकपत्ताकुटुंबातील सदस्यांची नावेही माहिती द्यावी लागते. त्यामुळे हे महत्वाचे विभक्त कुटूंब प्रमाणपत्र / Nuclear Family Certificate आपल्या संग्रहात असने गरजेचे आहे. त्याची PDF फाईल सोबत देत आहे. इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्राच्या अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.

PDF फाईल लिंक :- विभक्त कुटूंब प्रमाणपत्र / Nuclear Family Certificate


                                         
Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !