नाफेड तूर, हरभरा नोंदणी अर्ज / Nafed Tur, Harbhara Nondni Arj PDF
शेतकरी बांधव आपल्या शेती मालास योग्य दर मिळवा म्हणून नाफेड केंद्रावर आपल्या पिकाची नोंदणी करतात. तेथे तूर व हरभरा या पिकांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शेतकर्याची वैयक्तिक माहिती घेतली जाते. ती माहिती या अर्जात भरून द्यावी लागते. या फॉर्म मध्ये लिहावयाची माहिती खालील प्रमाणे आहे.
१) शेतकर्याचे नाव.
२) मोबाईल नंबर.
३) आधार कार्ड नंबर व वय.
४) संपूर्ण पत्ता.
५) गट नं. / सर्वे नं.
६) एकूण जमीन एकर मध्ये.
७) त्यापैकी पिकपेर्या वरील एकुण जमीन एकर मध्ये, तूर किंवा हरभरा पेरलेले क्षेत्र.
८) तूर पीक असेल तर पिकाची जात.
९) बँकेचे नाव.
१०) खाते क्रं.
११) IFSC कोड
१२) बँकेची शाखा
वरील माहिती भरल्यानंतर खालील कागदपत्रांती झेरॉक्स प्रत सोबत जोडावी लागतात.
१. ७/१२ २. होल्डिंग ३. तलाठी पीकपेरा ४. आधार कार्ड ५. बँक पासबुक
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know