प्रपत्र - 3 हमीपत्र नमुना कृषि यांत्रीकीकरण भाडेतत्वावर सेवा सुविधा पुरविणार्या संस्थे करीता/वैयक्तिक PDF
तुमची एखादी सेवा संस्था असेल किंवा वैयक्तिकरित्या
तुम्ही कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रीकीकरण उप
अभियानांतर्गत भाडेतत्वावर सेवा सुविधा पुरवण्या करिता औजारे/बँक सुविधा भाडेतत्वावर सेवा सुविधा पुरविणारे केंद्र स्थापन करू इच्छित असाल तर हे हमीपत्र तुम्हाला बॉन्ड पेपर
वर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना द्यावे लागते. या द्वारे
तुम्हाला कृषि यांत्रीकीकरण व अवजारे अनुदान मिळते व ते
तुम्ही भाडे तत्वावर शेतकरी बांधवांना देऊ शकता. या हमीपत्रात लाभार्थी/संस्था
खलील प्रमाणे हमी लिहून देतात.
1. मी स्वतः कृषि
यांत्रीकीकरण सेवा सुविधा पुरवीण्यासाठी सक्षम असून त्या अनुषंगाने यापूर्वी
केलेल्या कामांबाबत प्रमाणित तपशील सोबत जोडला आहे. आमची संस्था नोंदणीकृत असून
नोंदणी क्र. ................ वर्ष ................ आहे. संस्थेचे नोंदणी प्रमाण
पत्राची साक्षांकीत प्रत सोबत सहपत्रीत केली आहे.
2. आमच्या संस्थेस कृषि क्षेत्राशी निगडीत कामाचा व्यापक अनुभव आहे.
संस्थेच्या मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशन मध्ये कृषि विषयक कामांचा स्पष्ट उल्लेख असून
कृषि यांत्रीकीकरण सेवा-सुविधेचा संस्थेस अनुभव आहे. त्याबाबत कागदपत्रे सोबत
सहपत्रीत केली आहेत.
3. कृषि विभागामार्फत
राबविण्यात येणाऱ्या कृषि यांत्रीकीकरण उप अभियानांतर्गत भाडेतत्वावर सेवा सुविधा
पुरविणारे औजारे बँक स्थापणे व भाडेतत्वावर कृषि यांत्रीकीकरण सेवा सुविधा
पुरविणारे केंद्र स्थापन करण्याबाबत आमची संस्था इच्छूक असून त्यासाठी आवश्यक
मनुष्यबळ व प्रशिक्षित तांत्रीक कर्मचारी वृंद आमच्याकडे/संस्थेकडे उपलब्ध आहे.
4. केंद्र स्थापन
करण्यासाठी आमच्या जिल्ह्यातील पीक रचनेनुसार सर्व कृषि औजारांची सुरुवातीस
स्वखर्चाने रु. ............. लाख पर्यंत रकमेची औजारे खरेदी करण्यास मी/संस्था
तयार आहे. त्यासाठी आवश्यकतेनुरुप बॅन्क कर्ज प्रकरण करण्याची जबाबदारी
माझी/संस्थेची राहील व त्यासाठी येणारा सर्व खर्च मी/संस्था करेल. प्रत्यक्ष औजारे
खरेदी नंतर अनुदानाची रक्कम औजारे खरेदीच्या पावत्या सादर केल्यानंतर व प्रत्यक्ष
तपासणी करुन आमच्या बँक खात्यात जमा केली जाईल याची मला सुस्पष्ट कल्पना असून
त्यास माझी पूर्णत: संमती आहे.
5. अनुदानावर कृषि
यांत्रीकीकरण सेवा-सुविधा केंद्रासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या
संयंत्रे/औजारे/उपकरणे यांचे किमान सहा वर्षे हस्तांतरण, पुर्नविक्री किंवा
गहाणवट करता येणार नाही याची मला स्पष्ट कल्पना असून त्यास माझी संमती आहे. अशा
प्रकारे हस्तांतरण, पुर्नविक्री किंवा गहाणवट केल्यास
अनुदानापोटी मिळालेली संपूर्ण रक्कम व्याजासह एकरकमी वसूल करण्यास माझी विनाशर्त
अनुमती आहे.
6. अनुदानाचा लाभ
घेतल्याने त्याद्वारे प्राप्त करुन घेण्यात येणाऱ्या औजारांद्वारे/उपकरणांद्वारे
जवळपासच्या गावात शेतकऱ्यांना भाडेतत्वावर कृषि यांत्रीकीकरण सेवा-सुविधा माफक
दरात/शासनाने निर्धारीत केलेल्या दरात उपलब्ध करुन देण्यास मी बांधील राहील याची
मला कल्पना असून त्यास माझी संमती आहे.
7. सदर संयंत्रे, औजारे, उपकरणे यांची निगा राखणे, देखभाल-दुरुस्ती करणे याची
सर्वस्वी जबाबदारी आमची राहील, याची मला कल्पना असून त्यास
माझी संमती आहे.
8. याबाबत शासनाने
ठरवून दिलेल्या प्रपत्रात नियमीतपणे अहवाल सादर करण्याची माझी जबाबदारी आहे. तसेच
अभिलेख नोंदवही नमुना प्रपत्रात ठेवण्याची हमी मी देत आहे.
9. योजनेच्या
मार्गदर्शक सुचनांनुसार अशा केंद्रांसाठी इतर लागू असणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या पार
पाडण्याची मी/संस्था हमी देत आहे.
वरील व या अनुषंगाने शासनास आवश्यक सर्व बाबी व नियमांचे पालन करण्याची मी/संस्था या हमीपत्राद्वारे हमी देत आहे. या हमीपत्राची PDF फाईल खाली देत आहे. इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.
* PDF फाईल लिंक :- प्रपत्र - 3 हमीपत्र नमुना
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know