SBI KYC DETAILS UPDATION KYC ANNEXURE 'B' Form PDF

आपल्या दैनंदिन जीवनात बँकेत संबंधी अर्ज तसेच फॉर्म ची आपल्याला नेहमीच गरज भासत असते त्यातलाच हा एक केवायसी संलग्नक 'बी' फॉर्म आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया या बँके करिता केवायसी तपशील अपडेट करण्यासाठी या फॉर्मचा उपयोग केला जातो. बँक आपल्याला वेळोवेळी KYC करण्यास सुचवते कारण नौकरी किंवा अन्य कारणास्तव आपण राहात असलेला पत्ता बदलला तर नवीन राहत्या पत्त्यावर पुढील बँकेचे सर्व पत्र व्यवहार सुरळीत चालत राहतील. बँक आपल्या गरजेनुसार, मागणी नुसार ATM डेबिट कार्ड, चेकबुक इत्यादी आपल्या पत्त्यावर पोस्टा द्वारे पाठवते त्यामुळे KYC करून आपला पत्ता आद्यवत करत राहणे गरजेचे असते. या अर्जावर अर्जदाराचा खाते क्रमांक पॅन कार्ड क्रमांक नोंदवावा लागतो पॅन क्रमांक उपलब्ध नसल्यास रीतसर स्वाक्षरी केलेला फॉर्म 60 द्यावा लागतो. तसेच आपल्या व्यवसाय वार्षिक उत्पन्नाची माहिती द्यावी लागते. या केवायसी अर्जा सोबत स्वत: प्रमाणित केलेले खालीलपैकी कोणताही एक पुरावा जोडून त्या समोरील चौकटीत बरोबरची खूण करावी लागते.

1. पासपोर्ट 

2. ड्रायव्हिंग लायसन्स 

3. मतदार ओळखपत्र 

4. NREGA कार्ड

5. आधारच्या पुराव्याचे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे पत्र

केवायसी दस्तऐवज क्रमांक लिहून खालील घोषणा अर्जदार मान्य करतो.

* ग्राहकाची घोषणा:-

याद्वारे घोषित करतो की माझ्या ओळखीसाठी आणि पत्त्यासाठी मी सादर केलेले तपशील माझ्या सर्वोत्तम माहिती आणि विश्वासानुसार खरे आहेत. मी दिलेल्या माहितीनुसार माझे केवायसी तपशील/पत्ता अपडेट करण्यासाठी मी बँकेला अधिकृत करतो. मी तुम्हाला त्यात कोणतेही बदल असल्यास कळवण्याचे वचन देतो. वरील माहिती खोटी किंवा असत्य किंवा दिशाभूल करणारी किंवा चुकीची माहिती दिल्यास, मला याची जाणीव आहे की त्यासाठी मला जबाबदार धरले जाईल.

अर्जदार सही/अंगठ्याचा ठसा करून तारीख, नाव, ठिकाण, सध्याचा पत्ता, मोबाईल क्रमांक व ईमेल अशी माहिती देतो. बँक कर्मचारी KYC तपशील अपडेट करून अर्जदारास पोचपावती देतो. या महत्वाच्या फॉर्म ची PDF फाईल लिंक खाली देत आहे तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.

PDF फाईल लिंक:- SBI KYC DETAILS UPDATION KYC ANNEXURE 'B' Form

                                                                

Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !