अपंग लाभ अर्ज वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी PDF

    शासननिर्णय क्रमांक: व्हीआयपी-२०१६/प्र.क्र.२४/वित्त-३, दिनांक २८ एप्रिल २०१६ चे सहपत्रा नुसार फक्त वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लागू असलेला हा अपंग लाभार्थ्यांकडून भरून घ्यावयाच्या अर्जाचा नमुना आहे. हा अर्ज जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद/गटविकास अधिकारी पंचायत समिती/ग्रामसेवक ग्रामपंचायत यांना दिला जातो. वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठीचा निधी कोणत्या खात्यात जमा कारचा आहे त्या खात्याची माहिती व लाभ कोणत्या बाबासाठी होत आहे त्याची माहिती या अर्जात दिली जाते. तसेच खलील मुद्द्यानुसार माहिती दिली जाते:-

  1. अपंग लाभार्थ्याचे संपूर्ण नाव.
  2. लाभार्थ्यांचे अपंगत्वाचे प्रमाण (४०%,६०%,८०%)
  3. अपंग लाभार्थ्यांचे बँकेचे नाव व शाखेचे नाव.
  4. अपंग लाभार्थ्यांचे बँक खाते क्रमांक व IFSC Code
  5. अपंग लाभार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक.
  6. शासन निर्णय क्रमांक- अपंग २०१५/प्र.क्र.१३७/वित्त-३,दिनांक २४ नोव्हेंबर २०१५ मधील '' वैयक्तिक लाभाच्या योजनांमधून कोणती वस्तू/साहित्य घेऊ इच्छितो व त्यामुळे लाभार्थ्याचा काय फायदा होणार आहे?
  7. या वस्तू/साहित्याची अंदाजित किंमत.
  8. या वस्तू/साहित्याची वैशिष्ट्ये (Specification)
  9. यापूर्वी वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ मिळाला आहे का?:- होय/नाही
  10. लाभ मिळाला असल्यास, लाभाचे स्वरूप व योजनेचे नाव.
  11. प्रमाणित करतो की, जिल्हा परिषद/पंचायत समिती/ग्रामपंचायत मधील वैयक्तिक लाभाच्या योजनेतून माझ्या बँक खात्यावर वस्तू/साहित्य यासाठी वर्ग केलेल्या निधीमधून, मी वस्तू /साहित्य दोन महिन्यांच्या आत खरेदी करेन व सदर खरेदीच्या पावत्या संबंधित ग्रामपंचायत, ग्रामसेवकांस त्वरेने सादर करेन.

वरील माहिती देऊन संबंधित लाभार्थी खाली स्वाक्षरी करतो. या अर्जाची PDF फाईल लिंक खाली देत आहे तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.


PDF फाईल लिंक:- अपंग लाभ अर्ज

                                                                

Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !