नमूना नंबर 9 / Namuna No. 9 PDF

नमूना नंबर 9 हा फॉर्म रजीस्ट्री झाल्या नंतर विक्री करणार्‍या व्यक्तीस दिली जाणारी नोटीस असते. त्यात 15 दिवसाचा अवधी दिला जातो. या कलावधीत संबंधित मिळकती बाबत काही आक्षेप असल्यास कळवण्याचे सुचवले जाते. या मुदतीत आक्षेप आला नाही तर फेर मंजूर केला जातो. तसेच संबंधित मिळकतीच्या मालकीत बदल केले जातात. या सुचणे एवजी पहिले नमूना नंबर 4 चा उपयोग केला जात होता. मात्र आता नियम 14 व 24 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 150 (2) अन्वये नमूना नंबर 9 चा वापर केला जात आहे. ही नोटिस तलाठी यांच्या मार्फत बजावली जाते त्यात फेरफाराच्या नोंदवहीतील नोंदीचा अनुक्रमांक किंवा तारीख, संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप व ज्यातील अधिकार संपादन करण्यात आले आहेत तो भूमापन क्रमांक किंवा उपविभाग क्रमांक ही माहिती सुद्धा दिली जाते. या महत्त्वाच्या फॉर्म ची PDF फाईल लिंक सोबत देत आहे. तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.

PDF फाईल लिंक :- नमूना नंबर 9

           

Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !