New Pan Card / Pan Correction Form Annexure A & B PDF
आधार कार्ड नंतर लागणारा
महत्वाचा पुरावा म्हणजे PAN कार्ड
आहे. PAN कार्ड हा आकार विभागाचा महत्वाचा
पुरावा असतो. PAN म्हणजेच Permanent Account Number हा
आपल्या सर्व मोठ्या आर्थिक व्याहाराशी सलग्न करावा लागतो असतो. खलील काही
बाबींसाठी PAN कार्ड असणे आवश्यक असते.
1) बँकेत नवीन खाते काढण्यासाठी.
2) बँक KYC करण्यासाठी.
3) बँकेत नगद 50,000/- रू. व
त्यापेक्षा अधिक रकमेचा व्यवहार करण्यासाठी.
4) कुठल्याही प्रकारचे कर्ज मिळवण्याकरिता.
5) 50,000/- रू. व त्यापेक्षा
जास्त हप्ता असलेली विमा पॉलिसी काढण्यासाठी.
6) शेअर मार्केट मध्ये काम करण्यासाठी लागणारे DMAT खाते उघडण्यासाठी.
7) म्युचल फंड सारख्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी.
8) Income Tax भरणे
किंवा Income Tax
रिटर्न सादर करण्यासाठी.
9) GST नंबर मिळवण्यासाठी.
10) मिळकत खरेदी किंवा विक्री करण्यासाठी.
11) वाहन खरेदी करण्यासाठी.
12) ओळखपत्र म्हणून पुरावा.
हे सर्व आणि अशाच अनेक कामासाठी PAN कार्ड द्यावे लागते. PAN कार्ड काढण्यासाठी तसेच दुरूस्ती करण्यासाठी लागणार्या फॉर्म ची PDF फाईल लिंक सोबत देत आहे. तसेच PAN कार्ड काढण्यासाठी लागणार्या पूरक कागदपत्र आणि माहिती खालील प्रमाणे आहेत.
1) आधार
कार्ड झेरॉक्स प्रत :- PAN कार्ड
काढण्यासाठी सर्वप्रथम आधार कार्ड असणे गरजेचे आहे. डेमो ग्राफिक फेल ची समस्या
येत असेल तर आधार अपडेट करावे. नाव व जन्म तरिख चुकीची असू नये. PAN कार्ड ज्या
व्यक्तीचे काढवयाचे असेल ती व्यक्ति 18 वर्षापेक्षा कमी वयाची असेल तर वडील / आई / पालक यांच्या पैकी एकाचे आधार कार्ड जोडावे
लागते.
2) दोन
पासपोर्ट साईज फोटो :- फोटो अस्पष्ट व जास्त जुने नसावे.
3) आधार
कार्ड वर पूर्ण जन्म दिनांक नसेल तर जन्म तारखेचा पुरावा :- यासाठी इयत्ता
10
वी ची सनद, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा जन्म तारखेचे
स्वयंघोषणापत्र द्यावे. जन्म बाबत स्वयंघोषणापत्र Word फाईल सोबत देत आहे.
4) Annuxer A
Format - of - Gazette - Certificate :- हा फॉर्म PAN कार्ड मध्ये
जास्त प्रमाणात ( उदा. पूर्ण नाव व जन्म दिनांक ) दुरूस्ती करण्यासाठी लागणारा
फॉर्म आहे. त्यावर पासपोर्ट फोटो चिटकऊन सर्व माहिती भरून राजपत्रित अधिकार्याची
सही व शिक्का घ्यावा लागतो ( उदा. विद्यालयातील प्राचार्य ) या फॉर्म ची PDF लिंक सोबत देत आहे.
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा नियमित पोस्ट मिळवण्यासाठी टेलिग्राम जॉईन करा.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know